ताज्या घडामोडी

धानापूरच्या बावणे परिवाराने भागवली करंजी वासियांची तहान

ग्रामपंचायतीने सत्कार करीत मानले आभार

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी

मागच्यावर्षीच्या कडक उन्हाळ्यात करंजी वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.त्यावेळी शेजारधर्म जोपासत धानापूरात वास्तव्याने असलेला बावणे परिवार पुढे आला.आणि या परिवाराने विनामूल्य आपल्या विहिरीतील पाण्याचा पूरवठा करंजी गावाला केला.आणि गावकऱ्यांची तहाण भागवली.अन उन्हाच्या दिवसात होणारी गावकऱ्यांची होरपळ थांबली.यामूळे करंजी ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच श्यामराव बावणे यांचा सत्कार करीत आभार मानले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गाव चार हजार लोकवस्तीचे आहे.या गावात दोन पाणीपुरवठा योजना कार्यरत असून या योजनांच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा केला जातो.मात्र या दोन्ही योजनेच्या विहिरी कायमस्वरूपी पाण्याचे स्त्रोत राहील अशा ठिकाणी नाहित.परिणामी ग्रामपंचायतीला अधून-मधून पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.उन्हाळ्याच्या दिवसात तर गावकऱ्यांचे हाल होतात.पाण्यासाठी भटकंती करावी लागते.असाच प्रसंग गत वर्षीच्या उन्हाळ्यात आला.पाणी पुरवठा योजनेची विहिरी आटली.यामूळे कडक उन्हाळ्यात करंजी गावात पाणी वितरणाची गंभिर समस्या निर्माण झाली.त्यावेळी शेजारधर्म जोपासत धानापूरात वास्तव्याने असलेल्या बावणे परिवाराने मदतीचा हात पुढे करत करंजीतील पाणिपुरवठा योजनेच्या शेजारी असलेल्या आपल्या विहिरीतून उन्हाळभर पाणी देण्याचा शब्द दिला.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीकडून एक पैसाही मोबदला घेतला नाही.श्यामराव बावणे हे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत होते.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले.आणि शेती व्यवसायात रमले.विनामूल्य आपल्या विहिरीतील पाण्याचा पूरवठा करंजी गावाला केला.तहाण भागवत ऐण उन्हाळ्यात गावकऱ्यांची होरपळ
थांबवली.यामूळे ग्रामपंचायतीच्या वतीने श्यामराव बावणे यांचे आभार मानत सत्कार केला.यावेळी करंजीच्या सरपंच सरिता पेटकर,उपसरपंच जयश्री भडके,ग्रा.पं.सदस्य समीर निमगडे,रामदास मोहुर्ले,सचिन तेल्कापल्लीवार,संगीता निमगडे,शितल वाढई,जानवी तेल्कापल्लीवार,विलास पिंपळकर,झाराबाई चांदेकर,धनराज निमगडे आदीसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close