तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्पर्धकांनी नोंदविला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा तिरोडा जि. गोंदिया तर्फे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी शहीद मिश्रा महाविद्यालय तिरोडा येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन आदरणीय श्री अनुपजी बोपचे सर संचालक एस डी बी विद्यालय, खैरबोडी तसेच आदरणीय श्री अभिजित जोगदंड साहेब पोलीस उपनिरीक्षक तिरोडा यांच्या अध्यक्षतेखाली, राज्य कार्यकारणी सदस्य श्री यु पी पारधी सर, श्री के एस रहांगडाले संचालक जी प व शास कर्मचारी पतसंस्था भंडारा,श्री अरविंद उके सर जिल्हा सरचिटणीस म. रा. प्रा. शिक्षक संघ गोंदिया, श्री नरेंद्र आगाशे सर उपाध्यक्ष गोंदिया, श्री एम आर पारधी सर माजी सरचिटणीस, श्री एच एम रहांगडाले सर तालुका नेते तिरोडा , श्री शितल कनपटे सर अध्यक्ष , श्री शैलेंद्र कोचे सर कार्याध्यक्ष , श्री एन डी पटले सर तालुका संघटक , विजय पारधी सर सरचिटणीस ता.तिरोडा, सी एस पटले, विजय बिसन सर, , जे दि अंबुले, यू पी बीसेन सर तालुका मार्गदर्शक तिरोडा,श्री आशिष देवगडे सर कार्यालय सरचिटणीस ,श्री आर. डी ढोरे सर ,श्री एन डी जीभकाटे सर, किशोर बीसेन सर, व समस्त शिक्षक संघ पदाधिकारी ,तसेच आदरणीय श्री राजकुमारजी बागडे सर मुख्याध्यापक मनोरा तथा बुद्धिबळ स्पर्धा संयोजक तालुका तिरोडा यांच्या संकल्पनेतून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धक उपस्थित होते.
सदर स्पर्धा 15वर्षे व 15+ या दोन गटात घेण्यात आली , विजेत्यांना बक्षीस वितरण मा हुपराजजी जमईवार उपसभापती प स तिरोडा यांचे अध्यक्षतेखाली, ,मा नितीन आगाशे पत्रकार दैनिक भाष्कर, मा डी आर गिरीपुंजे तालुका लोकमत प्रतिनिधी, मा विजय खोब्रागडे प्रतिनिधी लोकमत .
एच एम रहांगडाले नेते शिक्षक संघ,राजू गुंनेवार, कु शिलाताई पारधी, जितेंद्र डहाटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य,इत्यादींच्या हस्ते प्राविण्य प्राप्त स्पर्धकांना रोख बक्षीस व ट्रापी देऊन गौरविण्यात आले. या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुल्या *गटातून दिगेश्वर चौरे प्रथम* क्रमांक तर आयुष चौरे द्वितीय क्रमांक सुजल रामटेके तृतीय क्रमांक मयंक कुर्वे चतुर्थ क्रमांक व रजत भोनडेकर यांनी पाचवे क्रमांक पटकावले. त्याचप्रमाणे पंधरा वर्षाखालील गटात अथर्व परमार याने प्रथम क्रमांक सक्षम सोनवाने द्वितीय क्रमांक स्वस्तिक शहारे तृतीय क्रमांक हर्ष पेशने चतुर्थ क्रमांक वृंद अग्रवाल यांनी पाचवे क्रमांक पटकावले या स्पर्धेचे चीफ ऑर्बिटर म्हणून सागर साखरे (लाखनी) यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमन नंदेश्वर क्रीडा शिक्षक,हर्षल खोब्रागडे ,आचल पेसने व इतर सर्व शिक्षकांनी मदत केली. यामध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना नाश्ताची सोय करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संचालन शितलकुमार कनपटे, शैलेश कोचे यांनी केले, व आभार राजकुमार बागडे सर संयोजक यांनी केले.
💐💐सौजन्य: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, उपशाखा, तिरोडा, जिल्हा, गोंदिया 🙏