भाजपा ओबीसी मोर्चा भंडारा तर्फे रक्तदान व मोफत नेत्रतपासनी शिबीर
प्रतिनिधी:गणेश पगाडे लाखनी
भारतीय जनता पार्टी द्वारा भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेन्द्रभाई मोदी यांचे जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते स्व.दीनदयाल उपाध्याय यांचे जयंती दि 25 सप्टेंबर हा कालावधी सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.
सेवा सप्ताह अंतर्गत भाजपा ओबीसी मोर्चा भंडारा ग्रामीण तर्फे मौजा डव्वा ता. भंडारा येथे रक्तदान व मोफत नेत्रतपासनी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन श्री रवींद्रजी चव्हाण, विदर्भ प्रभारी भाजपा ओबीसी मोर्चा यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवरामजी गिर्हेपुंजे जिल्हाध्यक्ष भाजपा भंडारा हे होते तर प्रमुख उपस्थिती श्री चामेश्वरजी गहाने प्रदेश कार्य. सदस्य, ॲड. कोमलदादा गभणे जिल्हाअध्यक्ष, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भंडारा जिल्हा, श्री. संजयजी गजपुरे, श्री. नीलकंठ कायते तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा भंडारा, सौ संध्याताई निंबार्ते सरपंचा, सौ श्यामकला उईके उपसरपंचा , श्री विलास उरकुडे त.मु. स. अध्यक्ष, श्री संदिप थोटे, सौ संगीताताई निंबार्ते, नितेश गोंधुळे, सुमित जगनाडे, निखिल टेटे हे व अनेक ग्रामवासी उपस्थित होते.
मौजा डव्वा परिसरातील 215 नागरिकांनी नेत्रतपासनी चा लाभ घेतला तसेच शिबिराचे यशस्वी आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा भंडारा तालुका अध्यक्ष श्री नीलकंठ कायते यांनी केले.