ताज्या घडामोडी
संस्कार महाविद्यालय पाथरी येथे HIV एड्स वर मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 1 डिसेंबर रोजी संस्कार महाविद्यालय, पाथरी येथे ग्रामीण रुग्णालय पाथरी व संस्कार महाविद्यालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्रम घेण्यात आला. युवा विद्यार्थाना प्रयोग शाळा तंत्रञ् रामदास वडजे यांनी HIV/ एड्स या आजाराबद्दल माहिती दिली या कार्यक्रमासाठी महाविल्याल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवराज नाईक सर, प्राचार्य शेजुळ सर, प्रा वाघमारे सर, प्रा अमोल कावळे सर, प्रा यादव सर, चव्हाण सर, जोशी मॅडम, तसेच लिंक वर्कर स्कीम च्या, नंदा गायकवाड मॅडम, प्रतिभा अंभोरे मॅडम आणि हनुमान घुमरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.