पाथरी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची द्वितीय सरमिसळ पद्धतीने विलगीकरण प्रक्रिया पूर्ण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेतील ईव्हीएम मशीन चे द्वितीय सरमिसळ पद्धतीने विलगीकरण करण्याचे काम शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था (आयटीआय )पाथरी येथे श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शंकर हांन्देशवार तहसीलदार पाथरी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आज ( रविवार) रोजी पूर्ण झाले यासाठी सकाळपासूनच नियुक्त केलेले सर्व कर्मचारी उपस्थित होते संगणकामार्फत सर्व बॅलेट युनिट,कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट चे सरमिसळ पद्धतीने विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.एकूण 498 कंट्रोल युनिट 498 बॅलेट युनिट , 539 व्हीव्हीपॅट यांचे सरमिसळ करण्यात आले आहे. या यामुळे कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या नंबरची बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशीन राहणार आहे याची माहिती होणार आहे. या कामासाठी वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक, ईव्हीएम सनियंत्रक मिटकरी, मास्टर ट्रेनर, तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.