पतंजली योग समिती कडून उपविभागीय अधिकारी चिमुर यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
योगगुरू स्वामी रामदेवजींनी सर्व जगामध्ये योग आणि अयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. करोडो लोकांनी योगयुक्त व रोगमुक्त जिवन जगण्याची दिक्षा घेतलेली आहे. आयएमए( NGO ) चे पदाधिकारी डॉ. जयलाल व डॉ. लेले कडुन आज तक न्युज चॉनल च्या चर्चासत्रा मध्ये विश्व योग गुरू स्वामी रामदेव महाराज यांना अपशब्द व अपमानित शब्द बोलल्या गेले त्यामुळे देशातील करोडो योगधारक व त्यांच्या अनुयांयांना ठेच पोहचली आहे. कोण्या योगी चा या प्रकारे अपमान करणे आणी लाईव चर्चासत्रा दरम्यान उद्धठपणे वागने या कृत्यासाठी आज तक चॅनलच्या चर्चासत्रामध्ये भाग घेणारे आयएमए चे पदाधिकारी यांचा निषेध आणि त्यांच्यावर कारवाई करण्या करीता पतंजली योग समिती चिमुर कडुन उपविभागीय अधिकारी चिमुर यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये तालुका पतंजली योग समिती , महिला पतजंली योग समिती आणि भारत स्वाभिमान चे पदाधिकारी रमेश कंचर्लावार , सारंग दाभेकर , राम चिचपाले , सुभाष नामपल्लीवार , किशोर डोलेबांधे , सौ. दुर्गा सातपुते ,सौ. शक्ती बंगारे , आणी योग शिक्षिका कु. रविना दाभेकर उपस्थित होते.