दिव्यांगाचे विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन

प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी
भंडारा:- प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील सर्व पदाधिकारी (जिल्हा संघटना, तालुका संघटना, शहर संघटना, महिला संघटना,) यांना सुचित करण्यात येते की, राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या आदेशानुसार आणि प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार

दिनांक 03 डिसेंबर 2021, रोज शुक्रवारला सकाळी- 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे माननीय ना. श्री. बच्चू कडू साहेब, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला जिल्हा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील दिव्यांगाच्या विविध मागण्या व प्रश्नासंदर्भात 03 डिसेंबर 2021 (जागतिक दिव्यांग दिनादिवशी) नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयांवर आंदोलन करण्यात येणार आहे तरी भंडारा & गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्रहार अपंग क्रांति आंदोलन संघटनाच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यकारिणी, शहर कार्यकारणी व शाखाप्रमुख, महिला आघाडी यांनी उपस्थित रहावे. कुणीही पदाधिकारी गैरहजर राहू नये
असे आवाहन प्रहार अपंग क्रांती आंदोलन,भंडारा जिल्हा यांनी पत्रकाद्वारे कळविलेले आहे .