ताज्या घडामोडी

संघटन कौशल्य, दुरदृष्टी व सातत्याचे मूर्तीमंत उदाहरण श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी- प्रा डॉ रमेश गटकळ

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव येथे श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात आयोजित व्याख्यान प्रसंगी व्याख्याते प्रा डॉ रमेश गटकळ बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की, जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता हिंदुस्थानात आहे, राष्ट्र निर्माणाच्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन संघ विचाराचा प्रसार व संघटन करताना त्यांच्या अंगी असलेल्या दुरदृष्टी, सातत्य व साहित्यिक मुल्ये या आधारे राष्ट्रीय दातृत्व व निर्माणाचे कार्य त्यांनी विविध पातळीवर केले, त्यामध्ये राजकिय, सामाजिक, साहित्यिक, अर्थिक इत्यादी क्षेत्रात काम करताना आपले आगळेवेगळे आदर्श स्थान निर्माण केले आहे. श्रमिक, कामगार, शेतमजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव ठेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
या कार्यक्रमाची सुरुवात सांघिक पद्य, भारत माता व श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी अध्यक्ष तथा श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड हे होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात प्रकाश दुगड यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेले गुण हे श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या अंगी होते यामुळेच त्यांचे नेतृत्व व व्यक्तिमत्व सर्वांसाठी आदर्श ठरले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ कमलकिशोर लड्डा, आभार प्रा राजाराम जाधव तर सुत्रसंचालन प्रा डॉ विकास बोरगावकर यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष राधेश्याम लोहिया, प्राचार्य डॉ महेश देशमुख, मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक विजयेंद्र चौधरी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदिप जोशी, सौ वंदना मिटकरी तसेच सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख सर्व शिक्षक,प्राध्यापक,
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता भारत माता आरतीने झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close