ताज्या घडामोडी
लोणी (बु) ग्रामपंचायत मध्ये आदर्श निर्णयाची अंमलबजावणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पिढ्यान पिढ्या प्रलंबित ” बौद्धस्मशान भूमी” चा प्रश्न निकाली .शासनाचा एक गाव एक स्मशानभूमी हा उपक्रम व भारतीय राज्यघटनेने दिलेल्या कायद्यासमोरील समानता या गोष्टीचा आधार घेऊन गावचे सरपंच शामराव धर्मे, मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे पोलीस पाटील रंजित नाना गिराम,अनंता कांबळे, विठ्ठल प्रधान ,बळीराम आवचार यांच्या नेतृत्वाखाली मोठी अडचण निकाली काढली.गावचे ग्रामसेवक फंड साहेब यांनी ग्रामसभेत एक गाव एक स्मशान भूमी व कायद्यासमोरील समानता या विषयाचे नव्याने ठराव मंजूर करून काटेकोर अंमलबजावणी करण्यासाची हामी दिली. युवकानी हे ठराव जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात, पंचायत समिती, पोलीस स्टेशन इ ठिकाणी सादर करून बौद्ध समशन भूमी ची अडचण संपल्याचे घोषित केले.