रामनगर गडचिरोली येथे तान्हा पोळा मोठ्या आनंद उत्साहाने बालगोपालासह खासदार अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत साजरा करून शांततेत संपन्न झाला
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
गडचिरोली रामनगर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक वॉर्ड क्रमांक २० येथे अनेक वर्षापासूनची परंपरा गुरुदेव सेवा मंडळ,रामनगर मध्ये बालगोपालासह नंदीबैल सजवून बक्षीस समारंभासह आयोजित करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने बालगोपालासह आपआपले नंदीबैल सजवून एकत्रित आणुन हर हर बोला महादेवाच्या गजरात साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकराचे पूजन करत खासदार अशोकजी नेते यांनी स्वतः उपस्थितीत राहून आरती केली.प्रसाद वितरण व त्यानंतर नंदीबैलांचे निरीक्षण करत बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन करुन बालगोपालांना व समस्त जनतेला तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते,आमदार डॉ.देवराव होळी, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे,लोकसभा समन्वयक तथा जिल्ह्याचे भाजपा महामंत्री प्रमोद जी पिपरे,जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी नगराध्यक्ष सौ योगिता ताई पिपरे,जेष्ठ नेते सुरेशजी मांडवगडे,महिला जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, आदिवासी मोर्चाच्या पदाधिकारी भावना हजारे(कुलसंगे) माजी तालुकाध्यक्ष नामदेवजी शेंडे, महीला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्ष कविताताई उरकुडे,युवा मोर्चा चे भाजपा उपाध्यक्ष दिपक सातपुते,अविनाश विश्रोजवार गणेश मंडळाचे आयोजक संजय मांडवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
अशाप्रकारे तान्हा पोळा उत्सव शांततेत मोठ्या आनंदाने, उत्साहाने रामनगर गडचिरोली येथे साजरा झाला.