ताज्या घडामोडी
अखेर ब्रम्हपुरीला ट्रॅफिक सिग्नल ची प्रतीक्षा संपली

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभूर्णे
ब्रम्हपुरी येथे वाढती ट्राफिक गर्दी पाहून ब्रम्हपुरी येथे महत्वाच्या चौकात ट्राफिक सिग्नल लावण्यात आले होते. परंतु फक्त केशरी रंगाचा दिवा लागत असल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष लाल दिवा लागून ट्राफिक नियंत्रित कधी होणार याची प्रतीक्षा होती. अखेर ती प्रतीक्षा संपली आणि आत्ता लाल दिवा पण लागला आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.आत्ता नियमित दिवे लागत आहेत. त्यामुळे बराच वाहतूक नियंत्रित राहत आहे. वाहतुकीची कोणती होत नाही.आत्ता ट्राफिक सिग्नल चे नियमित नियंत्रण ठेवणे आणि त्याचे पालन करणे आवश्यक आहे.