ताज्या घडामोडी

तहसील विभागांनी पावसाने बाधित गावातील शेती,घरे पाहणी करण्यासाठी तत्काळ आदेश द्यावे विलास डांगे यांची मागणी

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

चिमूर तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नेरी, खरखडा, चिखलापार,सावरगाव, कळमगाव कारघटा , मोठेगाव, खांबाळा, महादवाडी,शिरपूर, शिवनपायली , खुटाळा,हरणी, केवाडा , गोंदेळा,वडसी,खतोडा, मनेमोहाळी , अडेगाव देश,अडेगाव कोहळी, वाघेडा,सोनेगाव गावंडे, काजळ सर , लोहरा,लावरी मराळ, गोरवट, नवतळा, पिंपळनेरी, नवेगाव पेठ,तिरखुरा, महालगाव काळू, कन्हाळगाव , येरखडा, खापरी ,मिंजरी, कोटगाव, पारडपार ,टिटवी, बोळधा , हेटी, जांभुळघाट, मंगलगाव , मालेवाडा , उमरी बुट्टी,आंबेनेरी,बोरगाव बुट्टी, कपर्ला,जामगाव , वाढोना, सवर्ला डोंगर्ला,सिचोली ,गडपिपरी,काग,सोनेगाव,बामनी , कवडसी रोडी, शेडेगाव, चिमूर रेंगाबोळी, गदगाव, , कवठाळा, गरडापार, या गावातील अनेक लोकांची घराची पडझड झाली तर अनेकांची शेतीची आवजारे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली काहींच्या घरात पुराचे पाणी साचून धान्य इतर खाद्य पदार्थ मातीमोल होऊन खराब झाली वाहून गेली शेतात पेरणी केलेली धान,कापूस, तूर सोयाबीन यासहित इतर भाजीपाला चे खूप नुकसान झालेली आहे त्यामुळे मा.उपविभागीय अधिकारी, मा.तहसीलदार,यांनी मंडळ अधिकारी,तलाठी, कृषी
अधिकारी पशुधन विकास अधिकारी यांनी तातळीने प्रत्यक्ष चौकशीचे आदेश देऊन नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विलास डांगे यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close