ताज्या घडामोडी

वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी उलगुलान कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्य अभियंत्यांना निवेदन

मागण्यांची तातडीने पूर्णता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू राजू झोडेंचा इशारा

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उलगुलान कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंत्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सीआयएसएफ यांनी कंत्राटी कामगारांवर लावलेली दुचाकीवरील व मोबाईल वरील बंदी उठवावी, कंत्राटी कामगारांना याआधी दोन वर्षांची चारित्र्य प्रमाणपत्राची अट होती.मात्र आता ती सहा महिन्यांची करण्यात आली असून ही अट रद्द करण्यात यावी, कुणाल कंपनी युनिट नं 8/9 सी एच पी-डी मधील कंत्राटी कामगारांच्ये आठ वर्षी पासून मासिक वेतन,पी एफ कटिंग नाही,वेतन दोन दोन महिन्यात करतात ओवरटाइम च्या मोबदला नाही, कुशल कामगार च्या वेतन पण नाही, राजेंद्र गोंगले हा कंत्राटी कामगार मागील सहा वर्षांपासून तिरुपती कंपनीत कार्यरत असून त्यांच्या मागून आलेल्या कंत्राटी कामगारांना टेंडर मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे राजेंद्र गोंगले यांना सुद्धा समाविष्ट करण्यात यावे, कामगारांचे मासिक वेतन 10 तारखेच्या आत देण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन मुख्य अभियंत्यांना आज देण्यात आले आहे.

कंत्राटी कामगारांच्या न्यायिक मागण्या वीज केंद्र प्रशासनाने न सोडविल्यास वीज केंद्राच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे,रवि पवार,गुरु भगत,सुरज रामटेके, राहुल बदकल,सुमित भिमटे,कुणाल चौधरी, रत्नमाला ईलमकर,भिमराव सोदरमल, राजेन्द्र गोंगले यांनी एका निवेदनातून दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close