सकारात्मक विचार करणे काळाची गरज आहे – ब्रह्मा कुमारी मीरा दीदी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 11एप्रिल 2022 वार सोमवार रोजी क्रांती सूर्य महात्मा – ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ब्रह्मा कुमारी ज सोनपेठ यांच्या वतीने छोट्या मुलांना नीतिमूल्य सकारात्मक विचार या विषयी विविध खेळांच्या द्वारे ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी मनोरंन करवत मार्गदर्शन करत आपले विचार व्यक्त करते वेळी मीरा दीदी यांनी मुलांना लहान वयातच चांगल्या सवयी जडू शकतात त्यासाठी सकारात्मक रहा! खुश रहा!! आनंदी रहा !!! मोबाईल इंटरनेट टीव्ही कॉम्प्युटर या वस्तूंचा मर्यादित वापर करून मैदानी खेळ खेळाल तर आरोग्य चांगल्या प्रकारे लाभू शकेल , तसेच अनेक वेगवेगळे उदाहरन देऊन गोष्टी रूपाने मुलांना समजवण्याचा प्रयत्न मीरा दीदी जी यांनी केला तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित दिपाली माळी मॅडम व विद्यार्थी अथर्व मनमोहन झंवर, श्रवण बृजमोहन झंवर, वृषाली रंजवे, स्वानंद पैंजणी, सुदर्षण पोरे, सुरज पैंजणे ,अवधूत बडेकर, आर्यन बडेकर ,यश सोलापूरकर, गणेश गव्हाणे, पियुष रंजवे, भाग्यश्री बडेकर, आरती चोरमुले ,सोनाक्षी बदाले ,जानवी राऊत, हर्षदा चोरमुले, श्रावणी लोलगे etc विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा जोतिबा फुले त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून तसेच शेवटी मुलांना बिस्कीट चॉकलेट खाऊ देऊन , मी शांत स्वरूप आत्मा आहे (रेडियम स्टिकर) देऊन मेडिटेशन द्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .