महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज नेरी आयोजित दिपक महाराज भांडेकर यांचा सप्त खंजरी किर्तन व प्रबोधन कार्यक्रम

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
महात्मा ज्योतिराव फुले माळी समाज नेरी च्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती निमित्त श्री. दीपक महाराज भांडेकर यांचा राजीव गांधी व्यासपीठ बाजार चौक नेरी येथे सप्तखंजिरी कीर्तनाचा व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला नेरी वासिय तसेच खेड्यातील जनतेने भरपूर संखेत उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री. रामदासजी सहारे, उद्घाटक म्हणून श्री. संजयभाऊ डोंगरे, विशेष अतिथी म्हणून सौ. रेखाताई पिसे, सरपंच ग्राम पंचायत नेरी, प्रमुख अतिथी म्हणून प्रभाकर लोथे सर, पांडुरंग मेश्राम सर, वसंतराव कामडी, विजयराव कडुकार, सौ. ललिताताई कडूकार, राजीवजी पडवेकर, अशोकजी लांजेकार, घनश्यामजी लोथे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकरजी लोथे सर, अध्यक्ष माळी समाज नेरी तसेच सर्व माळी समाज बांधव यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेजल लोथे व आभार सौरभ सहारे यांनी मानले.