ताज्या घडामोडी

वढोलीवासियाचे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारपासून बेमुदत उपोषन सुरू

प्रतिनिधी – महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपीपरी तालुक्यातील वढोली साजा चे तलाठी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणी करिता वढोलीवासीयांनी आज दि.8 नोव्हेंबर रोज सोमवार पासून तहसील कार्यालय गोंडपीपरी च्या प्रांगणात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
विविध विभागाचा आढावा घेण्याकरिता ग्रामपंचायत वढोली येथे ग्रामसभा आयोजीत करण्यात आली.महसूल विभागाची वेळ आली तेव्हा नागरिकांनी तलाठयावर ताशेरे ओढले.दाखल्यांसाठी पैसे घेणे,कामासाठी शेतकऱ्याना हेलपाटे मारावयास लावणे यामुळे नागरिक संतप्त झाले.यावर सरपंचांनी जाब विचारला असता मी तुमच्या बापाचा नौकर नाही असे उघ्दटपणे बोलले.यानंतर प्रकरण हातापाईवर आले.या सगळया प्रकारांनतर तलाठी बल्की यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी घेऊन वढोली वासीय तहसील कार्यालय गोंडपीपरी च्या प्रांगणात आज दि.8 नोव्हेंबर रोज सोमवार ला बेमुदत उपोषण सुरू केले आहे.


ग्रामपंचायत वढोली येथे नुकतीच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.यात विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सरपंच राजेश कवठे यांनी सभा बोलाविली.सर्व विभागाचा आढावा पार पडल्यानंतर महसूल विभागाची वेळ आली.यावेळी वढोली साजा चे तलाठी जनार्धन बल्की उपस्थित होते.यादरम्यान नागरिकांनी बल्की यांच्या कारभारावर प्रचंड ताशेरे ओढले.शेतकरी बांधवांना कामासाठी दिवसेंदीवस ताटकळत ठेवणे,कामासाठी दलाल नेमून शेतकऱ्याकडून पैसे घेणे,पुरबुडी व
अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम देण्याकरिता पैसे घेणे या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी बल्की यांच्यावर संताप व्यक्त केला.
यावेळी बल्कींना उपस्थित नागरिकांनी जाब विचारला असता मी तुमच्या बापाचा नौकर नाही.मला विचारणारे तुम्ही कोण अशा शब्दात बल्कींनी नागरिकांनाच सुनावले.यावेळी सरंपच राजेश कवठे यांनी आक्रमक पावित्रा घेतला.व जाब विचारला असता बल्कींनी सरंपचांना मी तुला ओळखत नाही.तू कोण आहेस असे उर्मट उत्तर दिलेे.तलाठयाची हि मुजोरी लक्षात घेता सरपंच व गावकरी आक्रमक झाले.यावेळी हातापाईवर वेळ आली.पण काहींनी मध्यस्ती केल्याने प्रसंग टळला.यानंतर गावकर्यांचा आक्रमक पावित्रा लक्षात घेता तलाठी बल्कींनी ग्रामसभेतून निघून गेले.
प्रशासनाचा प्रतिनीधी शेतकरी बांधवांचे काम करण्याचे सोडून अरेरावीपणा करतो,अवैधरित्या पैसे कमवितो या मुळे सरपंचासह गावकऱ्यांनी ग्रामसभेचा अपमान करणाऱ्या तलाठीवर फौजदारी कार्यवाही झाली पाहिजे
या मागणीला धरून सोमवारपासून तहसिल कार्यालयासमोर वढोलीवासीय बेमुदत उपोषन सुरू केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close