ताज्या घडामोडी

चंद्रपूर नगरीत श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

चंद्रपूर शहरातील
संकट मोचन हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता विधीवत पूजा करुन हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. तद्नंतर आरती करण्यात आली. या शिवाय मंदिरात हवन देखिल करण्यात आले .यात बहुसंख्य सपत्निक भाविक सहभागी झाले . सायंकाळी 7 वाजता पुनश्च एकदा हनुमान चालीसाचे पठण करून आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाच्या दिन प्रक्रियेमध्ये श्री संकट मोचन हनुमान मंदिर डी आर सी रोड छत्रपती नगर येथे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, यांनी भेट देऊन दर्शन घेतले व मंदिराच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे या वेळी आश्वासन दिले. मंदिर समितीने त्यांचे आभारही मानले. तसेच शिवसेनेचे सुरेश पचारे व शिवसेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल काशीकर यांनी देखिल मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमित करपे , सचिन पोडे , राकेश नाकाडे, सचिन चलकलवार,सुरेशजी चटारे, पुरुषोत्तम ठेंगणे, प्रमोद एडलावार, विनोद एडलावार, रोहित पुरमशेट्टीवार, सुमित करपे, पवन कन्नमवार, विपीन येलमूले , पुरुषोत्तम राव, महेंद्र तिवारी, राजेश कवाडघरे, अतुल रुईकर, सुमित भोजेकर, गौरीशंकर धामणकर, वैभव मिटकर, अनुप गेघाटे, संदीप मत्ते , नितीन मत्ते, बादल गोरलावार, पवन चामलवार, विकास तायडे, आशिष हेडाऊ, कृपाल नाकाडे, सचिन मत्ते, सचिन सपाट, विजय हिवरे , महेश भुत्तेवार आदींनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close