ताज्या घडामोडी

विट्ठलवाडा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

आष्टी – गोंडपीपरी मार्गावर विठ्ठलवाडा जवळ झालेल्या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.16 डिसेंबर रोज गुरवारला रात्रौ 9:30 वाजता घडली आहे.
दुचाकीस्वार दुचाकीवर विदेशी दारूच्या बाटला घेऊन गोंडपिपरी कडून आष्टी कडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विठ्ठलवाडा जवळ अपघात झाला.
यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.
अपघात झालेल्या ठिकाणी विदेशी दारू आर एस,मॅजिक मुमेंट, वोडका दारू च्या बाटल्या पडल्याने रस्त्यावर दारूच्या फुटलेल्या निपाच्या काचा पडून होत्या.
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांना देण्यात आली असता
पोलीस घटनास्थळी दाखल झाले
जखमीला त्वरित रुग्णालयामध्ये नेण्यात आले तसेच मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीकरीत ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे.
सदर घटनेचे वृत्त लिहेपर्यन्त मृतकाची ओळख पटली नाही.
पुढील तपास गोंडपीपरी पोलिस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close