गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 5 जुन ला चिमूर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेत पार पडणार
प्रतिनिधीःराहुल गहुकर
कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
चिमूर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ निर्माण करणारे, वृक्ष, जल, वन्यजीव, पुरातण वास्तु संवर्धनाची जबाबदारी खांद्यावर घेणारे पर्यावरण प्रेमी तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थी व स्वच्छतादुतांचा सत्कार समारंभ चिमुर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी पतसंस्थेत पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक प्रा. राम राऊत राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी तुळशिदास महल्ले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मार्गदर्शक ममता डुकरे, भावना बावणकर, राजेंद्र लोणारे, ईश्वर डुकरे आणी पर्यावरणवादी मंडळांचे सदस्य अमोद गौरकार उपस्थित राहणार आहेत. सत्कार समारंभाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यावरण संवर्धन समिती चिमुर, भिसी व नेरी यांचेकडून करण्यात येत आहे.
सत्कार मुर्ती
(नवोदय पात्र विद्यार्थी संभव कापगते, प्रियांशू खाटे, सक्षम खोब्रागडे, यश
ठेपाले यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. तर ईशा वाघमारे, तनुजा
गंधारे, सुप्रिया राजूरकर, सृष्टी चट्टे, रोहीणी चाफले, ऋतुजा कुंभरे, प्रयास इंदोरकर, दिव्यवंदना आधार फाउंडेशन यांना सुद्धा गौरव केला जाणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतादुत नितू बघेल, सरिता बघेल, अरूणा सांडेकर, कल्पना साखरे, कल्पना जांभुळकर, प्रणयलता खोब्रागडे, स्मिता जांभुळकर, नैना रगडे, दिपा बघेल,
सविता इंदोरकर, शुभंम उंदिरवाडे, मनिष संघेल, दिलीप गोठे, गोरखनाथ मेश्राम आदी स्वच्छता दुतांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.)