ताज्या घडामोडी

ll दिन दलितांचे कैवारी ll

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती धरा,
शिका, संघटित व्हा, हाची सदैव मुखी नारा,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार खरा….

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले बाबासाहेब, भारतीय संविधानाचे जनक झाले बाबासाहेब…..

दिनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या श्रुंखला तोडणारे महायोद्धा झाले बाबासाहेब,
उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटविणारे प्रकाश सूर्य झाले बाबासाहेब…..

महाडच्या चवदार तळ्यावर दलितांना हक्क मिळवून देणारे दलितांचे कैवारी झाले बाबासाहेब,
समाजाने धिक्कारलेल्या लोकांसाठी आशेचा किरण झाले बाबासाहेब……

स्वतःच्या अलौकिक विद्ववत्तेचा वापर करून पहिले महामानव झाले बाबासाहेब,
कठोर परिश्रम, अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्ञानवादी, तपस्वी व कुशल नेतृत्वाचे धनी होते बाबासाहेब…..

6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले तरी तुमचे कार्य, तुमची तळमळ व जनतेला मिळवून दिलेल्या न्यायाच्या रूपात तुम्ही लाखो करोडो लोकांच्या हृदयात आजही जिवंत आहात बाबासाहेब,
आजही जिवंत आहात बाबासाहेब…..

अशा या महामानवाला त्रिवार वंदन… त्रिवार वंदन… त्रिवार वंदन……

सौ. सरोज वि. हिवरे
सहज सुचलं
काव्यकुंज मार्गदर्शिका
सहकार नगर रामपूर राजुरा
जिल्हा चंद्रपूर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close