ताज्या घडामोडी

इलेक्ट्रिक करंट चा शॉक कलागल्याने ग्राम पंचायत सदस्याचा मृत्यू

शंकरपूर येथील घटना

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे (RO) प्लांट च्या चॅनल गेट ला इलेक्ट्रिक करंट आल्याने ग्राम पंचायत सदस्य जागेवरच मृतचीत पडला याची माहिती काँग्रेस पार्टीचे डॉ.सतीश वारजूकर चिमूर – ७४ विधानसभा समन्वयक यांना मिळताच क्षणी घटनास्थळ गाठून मृतचीत पडलेल्या संजय मनीराम नन्नावरे यांना स्वतःच्या चार चाकी वाहनात टाकून उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी नेले त्यावेळी स्वासोस्वास सुरू होता.रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी मृतचीत रुग्णास मृत घोषित केले. यामुळे शंकरपूर वासीयांमध्ये शोककळा पसरली असून त्यांचा परिवारात आई पत्नी व दोन मुले तसेच एक भाऊ असा परिवार आहे. ते सतत दोनदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. तसेच मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची कामगिरी होती. मृतक संजय मनीराम नन्नावरे यांचे वय अंदाजे ४० वर्ष होते. ते मूळचे शंकरपुर येथील रहिवासी असून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close