चिमूर विधानसभेत वाढत्या लॉकडाऊन मुळे उपासमार अटळ. निराधार, अपंग यांना सहाय्यता निधी व बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता त्वरित द्यावा – आप ची मागणी

प्रा. डॉ. अजय पिसे यांचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेल द्वारे पत्र
बेरोजगारीचा मोठा प्रश्न सर्वच स्तरावरील घटक प्रभावित. शासनाने त्वरित उपाययोजना करावी.
शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी
लागोपाठ वाढवलेल्या लॉकडाऊन मुळे समाजातील सर्वच घटक प्रभावित झाले आहेत. व्यवसाय ठप्प झाल्यामुळे आर्थिक घडी पूर्णता कोलमडली गेली. आधीच्याच संचारबंदीत विस्कळलेल्या सामाजिक अर्थव्यवस्थेवर वाढलेल्या लॉकडाऊन मुळे अधिकच आघात झाला आहे. जनमानसांच्या आरोग्यव्यवस्थेसाठी जरी लॉकडाऊन आवश्यक असले तरीही व्यापारी, हात मजूर, ऑटो चालक यांना कोणताही आर्थिक आधार नसल्यामुळे त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे.
संचारबंदीत अनेकांनी नोकऱ्या गमावल्या मुळे बेरोजगारीची मोठी समस्या तयार झाली आहे. वाहन चालक, ऑटो चालक, फोटोग्राफर, वाजंत्री, हात मजूर यांचे संसार उघळ्यावर पडत आहेत. अश्यातच शासनाने निराधार व अपंगांना द्यावयाचे मानधन मागील काही महिन्यांपासून थांबवून ठेवले आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी कर्ज काढावे लागत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासनाने त्वरित निराधार, अपंग, यांना रोखून धरलेले वेतन द्यावे तसेच बेरोजगार झालेल्या वाहन चालक, ऑटो चालक, फोटोग्राफर, वाजंत्री, हात मजूर यांना बेरोजगारी भत्ता लागू करावा या आशयाचे पत्र चिमूर विभागीय अधिकाऱ्यामार्फत चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच मुखमंत्री कार्यालयाला आम आदमी पार्टी तर्फे ई- मेल द्वारे देण्यात आले.
जनतेच्या या समस्या आम आदमी पार्टी चे चिमूर-नागभीड विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात, आप चे जिल्हाध्यक्ष सुनीलजी मुसळे, संतोषजी दोरखंडे, भिवरावजी सोनी, परमजीत सिंघ यांच्या मार्गदर्शनात ई- मेल द्वारे प्रशासनाला कळविण्यात आल्यात. या समस्येवर त्वरित उपाययोजना न केल्यास बेरोजगारी व गुन्हेगारीचा मोठा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत व त्यासाठी शासन पूर्णता जबाबदार राहील असे ई-मेल मध्ये नमूद करण्यात आले. जनतेच्या या समस्येवर शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आप चे विशाल इंदोरकर, मंगेश शेंडे, आदित्य पिसे, विलास दिघोरे, अतुल खोब्रागडे, निरंजन बोरकर, विशाल बारस्कर, समिधा भैसारे, ज्योती बावनकर, वंदना घोनमोडे इत्यादी प्रयत्नरत आहेत.