आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था , कोसंबी गवळी वर भाजपाचा झेंडा
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
अध्यक्ष पदी श्रीरामजी मानकर तर उपाध्यक्ष पदी जगदीश पाटील राऊत यांची अविरोध निवड .
नागभीड तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था , मर्या.कोसंबी गवळी र.न. ११११ या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडही अपेक्षेप्रमाणे अविरोध झाली आहे. अध्यक्ष पदी भाजपाचे श्रीरामजी मानकर तर उपाध्यक्ष पदी भाजपाचे जगदिश पाटील राऊत यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली.
कोसंबी गवळीसह परीसरातील नवेगाव हुंडेश्वरी , गोवारपेठ, राजोली, बोंड, नवानगर, रानपरसोडी , वासाळा मक्ता व पारडी गायमुख या गावांचा समावेश असलेली ही नागभीड तालुक्यातील सर्वात मोठी संस्था अनेक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार बंटीभाऊ भांगडिया व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे १३ ही उमेदवार अविरोध विजयी झाले. यात सर्वसाधारण गटातून श्रीरामजी मानकर, पंढरी मानकर , ईश्वर रंधये, गोकुळ उईके, अशोक श्रीरामे, अमरदिप रंधये , रामप्रकाश राऊत व जगदिश पाटील राऊत यांची अविरोध निवड झाली. अनुसूचित जाती/जमाती गटातून गिरीधर इंदुरकर , इतर मागासवर्गीय गटातून गुरुदास गुरनुले , विमुक्त व भटक्या जमाती गटातून मधुकर ठाकरे तर महिला राखीव गटातून कौसल्या रावजी ठाकरे व उर्मिला उध्दव उईके यांची अविरोध निवडून आले.
पदाधिकारी निवडणुकीत अविरोध निवड झालेले अध्यक्ष श्रीरामजी मानकर व उपाध्यक्ष जगदीश पाटील राऊत यांचे भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी कोसंबी गवळी येथील संस्थेच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. यावेळी निवडणूक पिठासीन अधिकारी कु.व्हि.पी.भोज यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. याप्रसंगी कुउबास संचालक धनराज ढोक , माजी सरपंच मच्छिंद्र चन्नोडे , शक्ती केंद्र प्रमुख गुरुदेव नागापुरे ,ग्रा.पं.सदस्य कैलास रंधये, बुथ प्रमुख प्रविण श्रीरामे यांच्या सह संस्थेचे सचिव टोंगे यांची उपस्थिती होती.