महिला व कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रम
प्रतिनिधीः हेमंत बोरकर
उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी मंडळ यांच्या मागील 3 वर्षापासून विविध न्यायोचित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी खेटा खटल्यानंतर सरकारच्या भूमिकेत फरक न पडल्याने 25 जुलै 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण व महामोर्चा आयोजीत केला होता. आयोजीत बेमुदत आमरण उपोषण व महामोर्चा साठी चिमूर तालुक्यातील 20 महिला व 8 कर्मचारी सामील झाले होते.
दिनांक 25 ला पावसाळी अधिवेशनात मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी मंडळ यांच्या विविध मागण्याची दखल घेवून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करणाऱ्या प्रेरिका यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करून प्रती महिना 6 हजार रुपये देण्याचे सांगितले या करीता 163 कोटी रुपये अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची घोषणा मुख्मंत्र्यांनी केली. तसेच उमेद अभियानातील समूहांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुप्पटीने वाढ करून 30 हजार रुपये निधी प्रत्येक समूहांना मिळेल अशी घोषणा विधानसभेत केली.
या सर्व मागण्या पूर्ण करून आल्यानंतर चिमूर येथील पंचायत समिती सभागृह येथे मुंबई वरून आलेल्या महिला व कर्मचारी यांचे पुष्प देवून उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी मंडळ यांचे वतीने सत्कार करण्यात आला.