विविध सामाजिक उपक्रमांनी आमदार गुट्टे यांचा वाढदिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या १२ ऑगस्ट रोजी चा ६३ वा वाढदिवस राष्ट्रीय समाज पक्ष व डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत संपूर्ण मतदारसंघात अगदी थाटामाटात साजरा केला.
यावर्षी आमदार गुट्टे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवल्याने आमदार गुट्टे यांचा वाढदिवस काही विशेष बनला. या वाढदिवसानिमित्त सकाळी ७ वाजता लोर्ड व्यंकटेश्वरा मंदिर मार्केट यार्ड परळी रोड येथे पूजा व होम हवन करून वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दौऱ्यास सुरुवात झाली.संत जनाबाईचे दर्शन घेऊन गरजूंना चादर वाटप केले. खंडोबा मंदिर येथे मल्हारी मार्तंड प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार स्वीकारून वार्ड क्रमांक १ मध्ये लाभार्थ्यांना ६३ राशन कार्ड वाटप केले. तसेच गंगाखेड येथील खाजा बाबा दर्गा, गौसे पाक दर्गा व अफगाणी काका दर्ग्यावर चादर चढवली. कार्यकर्त्यांनी आयोजित कार्यक्रमात गंगाखेड येथील माजी सैनिक कार्यालयास वाटर फिल्टर भेट दिले. उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे डिलिव्हरी वार्डात बेडशीट व महिलांना गरम कानपट्टी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या सामाजिक उपक्रमातील सर्वात लक्षवेधी उपक्रम ठरला तो मतदार संघातील महिलांना ५० टक्के सवलतीच्या दराने पिठाची गिरणी वाटप करण्याचा कार्यक्रम. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महिलांना ५० टक्के सवलतीच्या दराने पिठाच्या गिरण्या वाटप करण्यात आल्या. यात गंगाखेड तालुक्यात ३२५, पालम तालुक्यात १७६ व पूर्णा तालुक्यात २०१ पिठाच्या गिरण्या खरेदीची नोंद झाली. गंगाखेड येथील संपर्क कार्यालयासमोर आयोजित विशेष कार्यक्रमात विधानसभा मतदारसंघातील महिलांना आ. गुट्टे यांच्या हस्ते पिठाची गिरणी वाटपास सुरुवात केली. यामुळे महिलांना लघु उद्योगास सुरुवात करणे सोयीचे होणार आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक १२ मध्ये मारुती मंदिराजवळील वृक्षांना जाळी लावण्याचा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद कन्या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक गंगाखेड येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. ह भ प संत सोपानकाका महाराज ईसादकर गंगोत्री आश्रम गंगाखेड व मालेवाडी येथे जाऊन श्री संत सोपान काका महाराजांचे दर्शन घेतले. श्रीकृष्ण मंदिर भावई महानुभाव मठ केशवनगर २ पालम रोड गंगाखेड येथे कार्यकर्त्यांनी आयोजित कार्यक्रमात मंदिरा करिता पाणी फिल्टर भेट देऊन मरडसगाव येथील कार्यकर्त्यांनी आयोजित कार्यक्रमात सत्कार स्वीकारला. त्यानंतर पालम व पूर्णा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहून उद्घाटन केले व कार्यकर्त्यांचे सत्कारही स्वीकारले.
यावर्षी आमदार गुट्टे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांनी साजरा केल्याने हा वाढदिवस कायम स्मरणात राहील असे आमदार गुट्टे यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांचे धन्यवाद व्यक्त करत विविध माध्यमाद्वारे शुभेच्छा व आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचेच आमदार गुट्टे यांनी या प्रसंगी आभार मानले आहेत.