ताज्या घडामोडी

रानडुकराच्या हल्ल्यात हिवरा येथील इसम जखमी


जखमी इसमाला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे हलविले

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
मो.7798332447

गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा येथे रामदास पाल
सकाळी सात वाजताच्या सुमारास गावालगतच्या शेतशिवारात शौचास गेले असता झुडपात दडून बसलेल्या रानडुकराने अचानक रामदास पाल यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात रामदासच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज दिनांक 10 मे रोज सॊमवारला सकाळी सात च्या सुमारास गोंडपीपरी तालुक्यातील हिवरा येथे घडली. रानडुक्कराच्या धडकेने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांनी वेळीच आरडाओरड केल्याने गावातील नागरिक जमा झाले त्यामुळे तेथून रानडूकराणे पड काढला त्यांना वेळीच उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे.

आज 10 मे रोज सॊमवारला हिवरा येथे रानडुकराच्या हल्ल्यात एक इसम जखमी झाल्याची घटना घडली असल्याने गोंडपीपरी तालुक्यात मानव आणि वन्यजीव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे असे मत वण्यजिव प्रेमींनी व्यक्त केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close