विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता : मुख्याध्यापक सचिन पिसे

राष्ट्र सेवा दल आयोजित निबंध स्पर्धेतील गुणवंत विदयार्थ्यांना बक्षीस वितरण
मुख्य संपादक:कु .समिधा भैसारे
विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव देणाऱ्या उपक्रमांची सध्या आवश्यकता असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते.राष्ट्र सेवा दलाने निबंध स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मंच उपलब्ध करून दिला.स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी अशा उपक्रमांची विद्यार्थ्यांना मदत होते. राष्ट्र सेवा दलाने घेतलेली स्पर्धा ही कौतुकाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक सचिन पिसे यांनी केले. राष्ट्र सेवा दल चिमूरतर्फे महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्र सेवा दल मंडळ सदस्य सुरेश डांगे,चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष रावन शेरकुरे, तालुका संघटक संजय सर,मंगला शिवरकर उपस्थित होते.भय्युजी महाराज विद्यालयातील प्रिन्सी गौतम पाटील हिने गट एकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.अंतरा पारस देवगडे व रुचिता अनिल ढोणे या विद्यार्थीनींनी प्रोत्साहनपर पारितोषिक पटकावले.
स्पर्धेत पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ श्री संत भय्युजी महाराज विद्यालय येथे मुख्याध्यापक सचिन पिसे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाला.गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, श्यामची आई पुस्तक तथा रोख रक्कम प्रदान करण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.शाळेला श्यामची आई पुस्तक भेट देण्यात आले.सुरेश डांगे,रावन शेरकुरे,संजय सर यांनी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संचालन सुरज तिडके यांनी केले.आभारप्रदर्शन मंगला शिवरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास गजभिये,दीपांकर धोटे,प्रवीण लोहकरे, राकेश पंधरे,विवेक वानखेडे आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.