ताज्या घडामोडी

SC, ST, OBC मायनॉरिटी विद्यार्थ्यांना संगणक टायपींग प्रशिक्षण द्या – भारतीय क्रांतिकारी संघटनेची मागणी

शहर अध्यक्ष नंदुभाऊ खापर्डे, परवेज साबरी, टेरेन्स कोब्रा याचें नागभिड नगर परिषद मुख्याधिकारी यानां निवेदन

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्यासाठी आणि स्पर्धात्मक युगात होतकरू गरीब सामान्य विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटना विद्यार्थ्यांच्या हितार्थ नेहमी आवाज उठवित असते.
मागील ग्राम पंचायत नागभिड असतांना शासनाच्या वतीने विशेष फंडातून विद्यार्थ्यांना संगणक टायपींग प्रशिक्षण देण्याचे प्रावधान होते. नागभीड नगर परिषद स्थापन होताच विद्यार्थ्यांच्या हितार्थ असे कोणतेही नियोजनबद्ध उपक्रम राबविलेले नाही.
नागभिड क्षेत्रातील SC, ST, OBC मायनॉरिटी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना 100% अनुदानावर मोफत संगणक टायपींग प्रशिक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भारतीय क्रांतिकारी संघटना पुढे सरसावून भारतीय क्रांतिकारी संघटनेचे नागभिड शहर अध्यक्ष नंदुभाऊ खापर्डे, शहर सचिव परवेज साबरी, उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यांनी नगर परिषद नागभिड येथील मा. मुख्याधिकारी यानां निवेदन दिले.
यावेळी संघटनेचे अक्षय उइके, शहर उपाध्यक्ष विशाल भसारकर, पाशाभाई पठाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close