ताज्या घडामोडी

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान -जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे

बल्हारपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडले भव्य रक्तदान शिबिर !

अनेकांनी केले रक्तदान !
एसडीओ डॉ.दिप्ती सुर्यवंशी-पाटील व
तहसीलदार डॉ.कांचन जगताप यांची उपस्थिती!

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

कुठल्याही क्षणी कुठल्याही रुग्णांना रक्ताची गरज भासू शकते त्या साठी अश्या प्रकारचे रक्तदान शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज आहे.इतकेच नाही तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे मनोगत चंद्रपूर जिल्ह्याचे‌ जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी व्यक्त केले .ते उपविभागीय अधिकारी कार्यालय ,तहसील कार्यालय व अन्य विभागाच्या सहकार्यांतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त काल सोमवार दि.१५ऑगस्टला स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करणा-या बल्हारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दिप्ती सुर्यवंशी -पाटील व याच तालूक्याच्या तहसीलदार डॉ.कांचन जगताप यांची या वेळी मुक्त कंठाने प्रशंसा केली. आजच्या या कार्यक्रमाला एसडीओ डॉ.दिप्ती पाटील , तहसीलदार डॉ.कांचन जगताप , कोषाधिकारी पंकज खनके , नायब तहसीलदार सतीश साळवे नायब तहसीलदार, फुलझेले ,नायब तहसीलदार, चंद्रशेखर तेलंग , चंद्रपूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राजु धांडे , बल्हारपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील ,व अन्य गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शैलेश धात्रक , बल्हारपूरचे कोषाधिकारी पंकज खनके यांचेसह अन्य ७५ कर्मचारी वर्गांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. विशेष म्हणजे याच शिबिरात तीन महिलांनी देखिल आज रक्तदान केले . रक्तदात्यांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.आपल्या भाषणातून जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सर्व उपस्थित अधिकारी वर्गांना व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरात वैद्यकीय पथकाने आपली महत्वाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अव्वल कारकून सुनिल तुंगीडवार गजानन उपरे,अजय गाडगे, दिपक वडूळे, चंदू आगलावे, प्रमोद अडबाले, निकिता रामटेके, स्मिता डांगरे, सचिन पुणेकर, कुणाल सोनकर, ( सर्व महसूल सहायक), प्रियंका खाडे पुरवठा निरीक्षक, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे , तलाठी शंकर खरुले महादेव कन्नके अजय नौकारकर शकुंतला कोडापे , शिपाई, व कोतवाल बांधवांचे विशेष सहकार्य लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close