रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी सिद्धेश्वर केकान

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शेतकरी हितासाठी महाराष्ट्रभर ही संघटना परिश्रम घेत असल्याचे चर्चिल्या जात आहे.
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव मगर, प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्याध्यक्ष तय्यब सय्यद पटेल. प्रदेश सरचिटणीस, सुनील ठोसर, प्रदेश सल्लागार अरुण खुंटे, दरम्यान महिला प्रदेशाध्यक्ष नयना गवळी, यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख संजय पाटील, यांच्या नेतृत्वाखाली व उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुनीता जाधव यांच्या शिफारशी नुसार रयत शेतकरी संघटनेच्या जालना जिल्हा अध्यक्ष पदी सिद्धेश्वर मुरलीधर केकान यांची नियुक्ती करण्यात आलीय. दरम्यान केकान यांनी आजपर्यंत शेतकरी हिताची कामे करत असल्याने त्यांची योग्य पदावर नियुक्ती झाली आसल्याचेही बोलल्या जात आहे इतकंच नाही तर दिलेली जबाबदारी सिद्धेश्वर केकाण पार पडणार असल्याचा विश्वास या संघटनेच्या पदाधकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.