आ.किशोर जोरगेवारांनी घेतले चंद्रपूर जिल्हा कारागृहातील गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
मोहरम निमित्त चंद्रपूरचे आ.किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी दुपारी जिल्हा कारागृहातील गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेत चादर चढविली. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे, रमजान अली घायल, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, युवा नेता ताहीर हुसेन यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरम्यान मोहरम निमित्त जिल्हा कारागृहातील दार भाविकांसाठी उघडे करण्यात आलेले आहे. यावेळी चंद्रपूरसह जिल्ह्यातील हजारों भाविकांनी श्रद्धेने कारागृहात असलेल्या गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेतले. चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार जोरगेवार यांनीही यावेळी जिल्हा कारागृहात भेट देत गैबीशाह वली समाधी स्थळाचे दर्शन घेत गैबीशाह वली यांच्या समाधी स्थळावर चादर अर्पण केली. यावेळी कारागृह दरगाह कमेटीच्या वतीने आमदार जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले.