नखाते विद्यालय पाथरी येथे बुध्यांक मापन चाचणी आक्रमाचे उदघाटन
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडावे – समाधान चवरे.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सध्याच्या काळात शिक्षणाचे अनेक क्षेत्र निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडविण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत परंतु विद्यार्थ्यांनी स्वतःचा मानस, आवड व कल लक्षात घेऊन पुढील शिक्षणाचे क्षेत्र निवडावे असे मत पाथरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी व्यक्त केले.
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित, शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तालुका पाथरी येथे मंगळवार दिनांक 28 जून रोजी दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित बुध्यांक मापन चाचणी उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. अनिलभाऊ नखाते हे उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक तथा समुपदेशक पडोळे बी.बी., तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी पोलीस स्टेशन चे गोपनीय शाखेचे प्रदीप हीरक, ग्रामपंचायत सदस्य बालाजी मुजमुले, मुख्याध्यापक यादव एन. ई., प्राचार्य डहाळे के.एन., उपस्थित होते.
पुढे बोलताना चवरे म्हणाले की, चिकाटी व जिद्द हीच यशाची खरी गुरुकिल्ली असते. यशस्वी होऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक ऋण फेडावे. संस्थेने घेतलेला बुद्यांक मापन चाचणी उपक्रम अत्यंत स्तुत्य असून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारा आहे असे वक्तव्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डहाळे के.एन. यांनी केले., उपस्थित विद्यार्थी व पालकांना मा. अनिलभाऊ नखाते यांनी अध्यक्षीय भाषण करताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेळके टी. एस. यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक गुंडेकर आर. जे. यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟨 विद्यार्थांना त्यांच्या आवडीप्रमाणे दिशा मिळावी यासाठी कल चाचणी चे आयोजन आवश्यक – मा. अनिलभाऊ नखाते.
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी या संस्थे आंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्व शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे बुध्यांक मापन चाचणी करून विद्यार्थी व पालक यांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे मा. अनिलभाऊ नखाते यांनी सांगितले. सुशिक्षित पालक आपल्या पाल्याचा कल ओळखण्यासाठी बुद्धिमापन चाचणी करून घेतात, विशेषतः ग्रामीण भागातील पालक या बाबीकडे दुर्लक्ष करतात ही बाब गंभीर आहे. योग्य भवितव्य घडण्यासाठी विद्यार्थ्यांनी कल चाचणी करून घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.