ताज्या घडामोडी
आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरूच !चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाचा आजचा 38 वा दिवस
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विविध रास्त मागण्यांसाठी राज्यभरातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांचे मुंबईच्या आझाद मैदानावर गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून याच आंदोलनाचा एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले असून आज या ठिय्या आंदोलनाचा 38वा दिवस असल्याचे आयटकचे नेते काॅ.रविन्द्र उमाठे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.शासनाने अद्याप या मागण्यांची दखल घेतली नसल्याचे ते म्हणाले.