ताज्या घडामोडी

६ आँक्टोम्बर पर्यंत स्ट्रीट लाइट कनेक्शन जोडले गेले नाही तर मी ७ तारखेला विद्युत अधिकारींचा सरपंच संघटनेला सोबत घेऊन घेराव करणार -आमदार विजय रहांगडाले

शहर प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा

मा. विजय रहांगडाले आमदार यांच्या कार्यालय तिरोडा येथे सरपंच -उपसरपंच संघटना गोंदिया तालुका च्या वतीने तीरोडा विधानसभा व गोंदिया तालुका अंतर्गत अनेक गावांमध्ये पथदिवे कापण्यात आलेले आहेत यामुळे या गावातील लोकांना फार त्रास होत आहे व संपूर्ण आरोप-प्रत्यारोप पुर्ण सरपंच वरती येत आहे.त्यामुळे त्या परिसरातील सरपंच महोदयांनी संघटनेकडे ही समस्या सांगितले तेव्हा मा. विजयजी रहांगडाले आमदार साहेब यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व मा. विजयजी रहांगडाले आमदार साहेब यांनी त्वरीत विद्युत विभागाचे अधिकारी यांना निर्देश दिले व त्वरित २ दोन दिवसांत कापलेली विद्युत जोडण्यात यावे अन्यथा मी स्वतः सरपंच -उपसरपंच संघटने सोबत ७ आँक्टोंबर ला गोंदिया येथील विद्दुत विभाग मध्ये विद्युत कर्मचाऱ्यांचा घेराव करणार असे ठणकावून सांगितले तसेच ड प्रपत्रामध्ये सुटलेल्या गरीब व गरजु लोकांचे नाव ग्राम पंचायत मध्ये होणार्‍या ग्रामसभेत समाविष्ट करण्यात यावे असे निर्देश मा. सीओ साहेब यांना दिले तसेच ड यादी तील सुटलेल्या नावात सरपंचमहोद्यांचा कुठलाही दोष नाही व सरपंच -उपसरपंच संघटनेच्या प्रत्येक मागणीला आपण नेहमी मदत करु व संघटनेच्या पाठीसी उभे राहू असे मा. आमदार विजयभाऊ यांनी आश्वासन दिले.सरपंच- उपसरपंच संघटना गोंदिया तालुका च्या वतीने मा. आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close