ताज्या घडामोडी

कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांना सुरक्षा संच वाटप

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

दिनांक २०/८/२०२१ रोजी सांगली येथे बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे व जिल्हा अध्यक्ष चांॅद गफुर शेख. यानी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार यांचेसाठी सुरक्षा संच व अत्य आवश्यक सुरक्षा संच. बांधकाम कामगार यांच्यात कामांवर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबांची सुरक्षा ध्यानात घेवून मंडळाने. कामांवर सुरक्षित काम करणेसाठी. हेल्मेट. बुट. सुरक्षा बेल्ट. बॅटरी. मच्छरदाणी. चटयी. जेवणाचा डबा. हॅणडगोलज. चार्जर. पेटी. अशा विविध वस्तू बांधकाम कामगार यांना मोफत देण्यात येतात. सोबत बांधकाम कामगार यांची अटल विश्व कर्मा विशेष बांधकाम कामगार आरोग्य तपासणी अभियान अंतर्गत कामगार यांच्या विविध मेडिकल तपासणी करण्यात येते. कामांवर असताना बांधकाम कामगार आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून बांधकाम कामगार यांना विविध प्रकारचे सहकार्य केले जाते
आम्ही आज किट वाटप केंद्राला भेट देऊन किट वाटप व आरोग्य अभियान या संबधि विचारपूस केली. त्यावेळी सर्व कर्मचारी यांनी अगदी सरळ व साध्या सोप्या पद्धतीने आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली प्रतिनिधी:– अहमद अन्सारी पाथरी परभणी मो न 7218275486.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close