विदर्भ लेवल कुंग फू कराटे स्पर्धेत शिवाजी पब्लिक स्कुल व ज्युनियर कॉलेज भिसी चे सुयश
प्रतिनिधी:राहुल गहूकर
नुकत्याच चंद्रपूर येथे पार पडलेल्या विदर्भ लेवल कुंग फु कराटे स्पर्धेत भिसी येथील शिवाजी पब्लिक स्कुल व ज्युनियर कॉलेज च्या सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
स्पर्धेचे आयोजन मॉस्टर निराधार आसुटकर व शिहान शाम भोवते यांनी केले होते स्पर्धेत दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये भिसी येथील नमन मिश्रा काता व फाईट प्रकारात दोन सुवर्ण पदक , वेदात गलगले काता रोप्य तर फाईट मध्ये काश्य पदक शुभांगी सावसागडे दोन सुवर्ण , कोमल लोहकरे दोन सुवर्ण संचिता नन्नावरे काता सुवर्ण फाईट रोप्य आर्या पारधी दोन रोप्य पदक प्राप्त केले . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिवाजी पब्लिक स्कूल भिसी चे नितेश उघडे, डॉ. सुशांत के. इन्दोरकर व आपल्या आई वडीलांना दिले .
विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षकांनी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या भिसी मध्ये सर्वांचे कौतुक होत आहे .