आदिवासी समाजक्रांती चे जनक बिरसा मुंडा यांच्या संगमरमरी मूर्ती ची बोथली येथे उत्साहात स्थापना
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नागपूर विभाग तर्फे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या १४५ व्या जयंती निमित्त दिनांक १५ नोव्हेंबर २०२० रोजी बोथली,जिल्हा नागपूर येथे जयपूर येथून संगमरमरी दगडा पासून निर्मित बिरसा मुंडा मूर्तीची स्थापना करण्यात आली व सप्तरंगी गोंडी ध्वजारोहण करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य दिनेश शेराम,पंचायत समिती सदस्य नितीन जी देवतळे,पंचायत समिती सदस्य तथा नागपूर ग्रामीण जिल्हा युवा अध्यक्ष राहुल मेश्राम,विदर्भ युवा कार्याध्यक्ष संतोष जी आत्राम,सामाजिक कार्यकर्ते अमन जी बोरे, ग्रामपंचायत सदस्य विजय मरस्कोले,नागपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष सुनील कंगाली, शाम कुमरे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी आदिवासी महापुरुष,आदिवासी संस्कृती रक्षण व आर्थिक सक्षमता या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक कंगाली ,आकाश कोकाटे,धूर्वे जी जगण कंगाली,लक्ष्मण उईके,विजय कुमरे,धनराज मडावी,विनोद कंगाली,उत्तम कुमरे,दीपक आत्राम,अमोल कुडमते,किशोर मडावी,विक्रम उईके,रोशन मसराम,गणेश वालवंशी,ओम येटे,नयन गेडाम विजय परतिके, स्वप्नील मसराम,राहुल मेश्राम,यशवंत मसराम,राहुल मडावी,प्रमोद उईके,सचिन आत्राम,सुरेंद्र नैताम,रोशन यादव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.