ताज्या घडामोडी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी(अजीत पवार गट) काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते लागले जोमाने कामाला
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
मोजा चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथे आज़ दि.8/जुन/2024 ला युवक तालुका अध्यक्ष मनीष वजरे यांच्या नेत्रुत्वात दीपक भाऊ दुधे तालुका उपाध्यक्ष यांच्या घरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्तेची सभा घेण्यात आली .आपला पक्ष येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षांसाठी, आपल्या बुथ अध्यक्षांचा आपला बुथ कसा मजबूत करता येईल याची माहिती देण्यात आली. सदर सभेला मनीष वजरे (अध्यक्ष चिमूर तालुका युवक ), दीपक भाऊ दुधे (तालुका उपाध्यक्ष ), मेहबुब भाऊ शेख (अल्पसांख्यक तालुका अध्यक्ष) राष्ट्रपाल गेडाम, स्वरूप तळवेकर तालुका उपाध्यक्ष युवक मोटेगाव , तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.