ताज्या घडामोडी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक -युवती विचार मंच तालुका वरोरा यांचे डोंगरगाव (रेल्वे) येथें ग्रामस्वछता अभियान

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 व्या पुण्यस्मृती महोत्सवा निमित्य डोंगरगाव (रेल्वे) येथे सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच तहसील वरोरा यांची मासिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ह.भ.प केशव महाराज खिरटकर. यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यानंत लगेचच ग्रामस्वछता अभियानाला सुरुवात केल्या गेली व संपूर्ण गावातील मार्गांची व सार्वजनिक स्थळांची श्री गुरुदेवाच्या व राष्ट्रसंतांच्या जयघोष गजरा सोबत स्वछता करण्यात आली.

संतांचा समाज कल्याणाचा वारसा व त्यांचे अनमोल विचार आपण गावागावात पोहचवू आणि एक आदर्श समाज घडविण्याचा प्रयत्न करू अशी सर्वांनी प्रतिज्ञा सुद्धा केली. राष्ट्रसंतांच्या या पुण्यस्मृती सोहळ्या निमित्त गावामध्ये रांगोळी स्पर्धां ही घेण्यात आली होती. RTM युवक-युवती विचार मंच वरोरा चे सदस्य श्री हितेश चंद्रभान घुगल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आशिष माणुसमारे होते. सचिव श्री शुभम आमने उपाध्यक्षय परमात्मा पंधरे सदस्य , रुपेश कुत्तरमारे, स्वप्नील कुथे, अक्षय जांभुळे, प्रदीप चौधरी, इ सदस्य उपस्थित होते. या सर्व टीम नि गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. गावातील गुरुदेव सेवा भजन मंडळाचे सदस्य श्री रोशन काळे, शैलेश खिरटकर, शुभम चिकटे, प्रतीक सोमलकर, या सर्व मंडळींनी सुद्धा या अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद दिला त्या बद्धल सुद्धा सर्वांचे आभार व्यक्त केले. व हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close