ताज्या घडामोडी

भा.ज.पा.जिल्हा गोंदिया जिल्ह्याची विस्तारित बैठक

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

दि. १३ जानेवारी २०२४ शनिवार रोजी गुरुकृपा लॉन तालुका गोरेगांव येथे आयोजीत करण्यात आलेली होती.
सदर बैठकीला प्रामुख्याने विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर,खा.अशोकजी नेते,खा.सुनिल मेंढे,आ. विजय रहांगडाले,लोकसभा प्रभारी डॉ.परिणय फुके, जिल्हाध्यक्ष ऍड.येशुलालजी उपराडे,माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष केशवभाऊ मानकर,माजी आमदार भैरसिंगभाऊ नागपुरे,हेमंत पटले,रमेश कुथे,भजनलाल जी वैद्य, खुमेश रहांगडाले,गोंदिया भंडारा संपर्क प्रमुख .बाळाभाऊ अंजनक, विजयभाऊ शिवणकर, जि.प.जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले,माजी आमदार संजयभाऊ पुराम,अशोक इंगळे,रचनाताई गहाणे, नैत्रामजी कटरे, शंकरजी मडावी,खुमेशवरीताई बघेल, अनिल अग्रवाल,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे,हनुमान वट्टी,विश्वजीत डोंगरे,सविता ताई मडावी, शालीनीताई डोंगरे,तसेच मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर बैठकीला बोलतांना खासदार श्री.अशोक नेते यांनी भारतीय जनता पार्टीच्या संघटनेबद्दल विस्तृत माहिती देत “बुथ जीतो, चुनाव जीतो” या घोषवाक्याला अनुसरून बुथावरील संपूर्ण माहिती,बुथ नियोजनावर विशेष भर देन्याविषयी सांगितले.तसेच, आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी भारतातला एक नंबरचा पक्ष आहे आणि यांचे आपण सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आहात.
यासाठी एकत्रित येऊन भाजपा संघटनेच्या जोमात कामाला लागावे असे जिल्हा विस्तारित बैठकी दरम्यान खा.नेते यांनी प्रतिपादन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close