ताज्या घडामोडी

भजनाच्या माध्यमातून होत आहे समाजप्रबोधनाचे काम

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

झाड जडले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बाम!!
भक्त बनेगी सेना!!
या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने चिमूर तालुक्यातील जनतेमध्ये देशभक्ती निर्माण झाली आणि चिमूर तालुका येथील जनता इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी लढा देऊ लागली, आणि 1942 मध्ये चिमूर क्रांती घडली,आणि भारत देशात प्रथमच चिमूर स्वातंत्र झाला.
तर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील महिला, दलित, बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा दिला, त्यांनी निर्माण केलेली चळवळ, त्यांची संघटना व त्यांचे काम भजन, पोवाडे, गीते यांच्या माध्यमातून वामनदादा कर्डक व इतर लोकांनी समाज प्रबोधन करून समाज जागृत करून बाबासाहेबांचे विचार व चळवळ सामोर नेली.
आज देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आहे परंतु देशात आजही काही जुन्या रूढी परंपरा कायम आहेत आणि त्या मिटविण्यासाठी समाजाला महापुरुषांच्या विचारांची गरज आहे.
महापुरुषांचे विचार भजना द्वारे पूजनाचे काम आजही सुरू आहे, समिश्र पंचशील भजन मंडळ खापरी (डोमा ) तालुका चिमुर येथील भजन मंडळ मागील 15 ते 20 वर्षापासून कार्यरत असून आजपर्यंत पूर्व विदर्भात त्यांनी शेकडो कार्यक्रम घेत समाज प्रबोधन केले आहे.
अरुण गणवीर, विलास रामटेके, धनराज शेंडे,दिलीप रामटेके, रूपचंद गणवीर, जगदीश मादांडे, हिराचंद रामटेके, अलका गणवीर, सुप्रिया पाटील, पंचशीला रामटेके, जासूनदा रामटेके, शारदा रामटेके, अस्मिता मादाडे, माया शेंडे, कांता रामटेके, मोहना मेश्राम, सुभाष गणवीर, सुनील मोहुर्ले अशा अठरा लोकांचा भजन मंडळ असून त्यांच्या भजन मंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, समिश्र पंचशील भजन मंडळ खापरी (डोमा ) यांच्या कार्याची जनतेकडून सरहाणा होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close