ताज्या घडामोडी

ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निरसन होणे आवश्यकअपर जिल्हाधिकारी – डॉ. प्रताप काळे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला असून, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून ही परिषद स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निरसन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केले.

अपर जिल्हा धिकारी डॉ. काळे यांच्या अध्यअक्षतेखाली नुकतीच जिल्हाकधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हार ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक घेण्याात आली. त्यावेळी डॉ. काळे बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाक पुरवठा अधिकारी विलास मुसळे, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्तर अ. ए. चौधरी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. डि. जी. वडमिलवार, सहाचयक मोटर वाहन निरीक्षक जयंत अंकमवार, वैधमापन शास्त्र् विभागाचे निरीक्षक संभाजी बिल्पेअ, महावितरणचे सहायक अभियंता महे श लांडगे यांच्यासह जिल्हाक ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्यश उपस्थित होते.

बैठकीच्याो सुरुवातीस मागील बैठकीमध्येे प्राप्तह तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित विभागांमार्फत करण्याणत आलेल्याय कार्यवाहीची माहिती देण्यात आली. यानंतर बैठकीत जिल्हाी ग्राहक संरक्षण परिषदेच्यात अशासकीय सदस्यांयनी ग्राहकांच्याि विविध तक्रारी मांडल्यात. प्राप्तष झालेल्याय तक्रारींवर सविस्तयर चर्चा करण्याषत आली. बैठकीच्या माध्यमातून ग्राहकांचे अनेक प्रश्न सोडवले गेल्याबाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी समाधान व्यक्त केले. अपर जिल्हाेधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित विभागांना योग्यर त्याा कार्यवाहीस्तपव सूचना दिल्याि. तसेच सर्व संबंधित विभागांना पत्राद्वारे योग्या ती कार्यवाही करून अहवाल मागवण्या‍बाबत कळविले आहे. अशासकीय सदस्यांनी दिलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत समाधान केल्याबद्दल परभणी येथील नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांचा यावेळी सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close