नागभीड तालुक्यात अंगणवाडीतील पोषण आहारात थेट प्लास्टिक सारख्या दिसणाऱ्या तांदुळाचा पुरवठा

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
अनेकदा सरकारी योजनांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार असतात . मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात अंगणवाडीतील पोषण आहारात थेट प्लास्टिक सारख्या दिसणाऱ्या तांदुळाचा पुरवठा करण्यात आल्याने संबंधित बिभागात खळबळ माजली आहे . नागभीड च्या अंगणवाडी केंद्रातून महिलांना तेल , मिठ , दाळी , तांदूळ असे धान्य वाटप करण्यात आले .यावेळी तांदूळ शिजवण्यासाठी निवडत असताना नागभीड शहरातील नागरिक शंकर गणपत अमृतकर , यांना तांदूळ भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आले . अमृतकर यांनी हे भेसळयुक्त तांदूळ अनेकांना दाखविले व चव घेण्यास सांगितले असता अनेकांनी हे भेसळयुक्त तांदूळ प्लास्टिक तांदूळ सारखे वाटू लागल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या .या प्रकारानंतर या घटनेची माहिती संबंधित विभागाला कळवून पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणी संबंधितांनी केली आहे .