वरोरा येथे युवासेना शिव संपर्क अभियान आढावा बैठक
आपल्या हक्काचा युवासेनेचा सिनेट सदस्य निवडून आणा-हर्षल दादा काकडे.
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे,युवासेना सचिव वरून सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेशदादा कदम यांच्या आदेशानुसार वरोरा येथे युवासेना शिव संपर्क अभियान निमित्त आढावा बैठक पार पडली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा सेना विभागीय सचिव (पुर्व विदर्भ) हर्षलभाऊ काकडे तसेच विशेष उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी,शिवसेना वरोरा शहर प्रमुख संदीप मेश्राम,शिवसेना नगरसेवक दिनेश यादव,युवा सेना वरोरा तालुका अधिकारी भूषण बुरीले,भद्रावती तालुका अधिकारी महेश जीवतोडे,भद्रावती तालुका समन्वयक घनश्याम आस्वले,शहर प्रमुख माजरी सरताज सिद्दकी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी, संचालन तालुका अधिकारी भूषण बुरीले, आभार प्रदर्शन शिवसेना सोशल मीडिया सेल तालुका प्रमुख गणेश चिडे यांनी केले.
त्यावेळी उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख लक्षमण ठेंगणे, बाळा क्षीरसागर, युवासेना उपतालुका प्रमुख महेश देवतळे, अक्षय ताजने, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे, राहुल दांरुडे, युवासेना शहर सनम्यवक गणेश जानवे, गौरव नागपुरे, माजी विद्यार्थी शहर प्रमुख येशू आरगी,कीर्तीताई पांडे, मायाताई टेकाम, प्रीती साव, मनीषा जुनारकर,अमित निब्रड, प्रसाद खडसान पियुष जगताप,अतुल नांदे, सोहेल शेख, सोनू पित्तलवार, दीपक यादव, मनोज गाडगे, अक्षय झिले, आशिष झाडे, सुहास मोडक व समस्त शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या हक्काचा युवा सेनेचा सिनेट सदस्य निवडून आणा अशी सूचना पूर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षलदादा काकडे यांनी केली.