ताज्या घडामोडी
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पुणे विभागाच्या वतिने मातृदिना निमित्त आरोग्य शिबिर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.८/५/२०२२ : पोलीस मिञ परिवार समन्वय समिती पुणे विभागाच्या वतिने पश्चिम महाराष्ट्र विधी सल्लागार मा.अॅड.ज्योतीताई विरकर मॅडम,महिला पुणे जिल्हा प्रमुख मा.ज्योतीताई व-हाडे मॅडम यांच्या नेतृत्व खाली आपली समाजाप्रती सामाजिक जबाबदारी समाजुन “मातृदिना निमित्त” लुंबिनी कुंज बुद्ध विहार,डेपो लाईन शेजारी खडकी येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या आरोग्य शिबिरामध्ये स्त्री रोग,कर्करोग,कान,घसा तपासणी व अस्थिरोग तपासणी,हृदयरोग तपासणी करण्यात आली.यासाठी
कॅन्सर केअर रिसर्च सेंटर पिंपरी चिंचवड पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने या शिबारासाठी मदत झाली.सदर उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कैतुक केले जात आहे.