उच्च शिक्षण घेवून विद्यार्थ्यांनी समाजाची आण बाण शान वाढावावी -ना.सुधीर मुनगंटीवार

राज्यस्तरीय गोल्ला – गोलकर (यादव) समाजाचा चंद्रपूरात महामेळावा संपन्न !
मूलचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवारांसह झाला अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण संपादीत करुन आपल्या समाजाची आण बाण शान वाढवावी असा मोलाचा सल्ला काल रविवारला राज्याचे वने सांस्कृतिक कार्य , मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.ते गोल्ला-गोलकर , गोल्लेवार- यादव समाज संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सकाळी 11 वाजता स्थानिक राजीव गांधी सभागृह ,(जंयत टाॕकीज जवळ ,चंद्रपुर )येथे भव्य राज्यस्तरीय उपवर-उपवधु परिचय मेळावा , गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तथा समाजात उल्लेखनीय कामगिरी करणांऱ्या सेवा निवृत्त अधिकारी , कर्मचारी,व लोकप्रतिनिधी यांचे सत्कार समारंभात उद्घाटनीय भाषण करीत असताना बोलत होते .आपण या समाजासाठी या अगोदर २५ लाख रुपयें दिले असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून यावेळी केला.प्रास्ताविक भाषण समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून गोल्ला गोलकर यादव समाजाला आरक्षण देण्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले . तदंपुर्वी या समाजाचे वतीने व्यासपीठावर ना.सुधीर मुनगंटीवार यांना याच आरक्षणा संदर्भात एक निवेदन देण्यात आले. सदरहु भव्य मेळाव्यात विदर्भ पटवारी संघटनेचे जिल्हा शाखा चंद्रपूरचे माजी जिल्हाध्यक्ष , मंडळ अधिकारी संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी , मूलचे एक प्रगतीशील शेतकरी तथा चंद्रपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुरुषोत्तम कोमलवार यांचे सह गुणवंत विद्यार्थी तथा उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या समाजातील अनेक मान्यवरांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ समाजसेवक गणपतराव बुर्रीवार यांनी विभूषित केले होते.आयोजित महामेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून चित्रपट निर्माते तथा साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद तेलंगाणाचे रविकिरण यादव ,नामदेवराव आयलवाड, क्रिष्णाजी यादव ,प्रकाशराव मॅकलवार ,श्रीरामजी गालेवाड मनोहरजी बोदलवार पुरुषोत्तम कोमलवार,श्रीनिवास जल्लेवार डाॕ.भास्कर बहिरवार,दिगांबर जंगीलवाड ,दिगांबर करेवाड, सुनिल उट्टलवार, प्राचार्य साईनाथ आदर्लावार, भास्कर नन्नावार,संतोष मंथनवार ,आंनदजी विरय्या यशवंत दंडीकवार ,आशिष कावटवार ,मलन्नाजी बुरमवार सोमेश्वरजी पाकेवार आदीं उपस्थित होते. राज्यस्तरीय महामेळाव्याला महाराष्ट्रातील गोल्ला-गोलकर ,गोल्लेवार- यादव समाजबांधवांची मोठ्या संख्येंने उपस्थिती लाभली होती .वधु वर परिचय मेळाव्यात अनेक उपवर वधु वरांनी आपला परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय मॅकलवार , उपाध्यक्ष दिलीप मॅकलवार ,किरण चेनमेनवार ,सचिव महेश मॅकलवार ,कोषाध्यक्ष कृष्णाजी दाऊवार ,सहसचिव शंकर मद्देलवार ,श्यामराज भंडारी ,संघटक प्रविण भिमणवार तसेच संपुर्ण कार्यकारणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.राजीव गांधी सभागृहात काल आयोजित मेळाव्याला राज्यातील समाज बांधवांनी उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद दिला होता.









