ताज्या घडामोडी

उखर्डा मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवा अन्यथा आंदोलन -अभिजीत कुडे राष्ट्रवादी युवक कांग्रेस

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा तालुक्यातील उखर्डा मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात आले नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा अभिजीत कुडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका यांनी दिला आहे.
उखर्डा ते नागरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात तोल जाऊन अनेक वाहन चालकांना दुखापत झाली असून वाहनचालकाचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजीत कुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व क्षेत्राचे आमदार यांच्याकडे केली होती. परंतु यांची दखल कुणीच न घेतल्याने शेवटी मागील वर्षी उखर्डा येथील रस्त्याच्या खड्ड्यात बेशरमांची झाडे लावून अनोखे असे अभिनव आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन प्रशासनाने तात्पुरता मुरूम रस्त्याच्या कडेला टाकून ठेवला आहे. परंतु अजून पर्यंत तो मुरूम खड्ड्यात पडलेला नाही. त्यानंतर त्या खड्ड्यात दिवे लावून दिवाळी साजरी करुन सार्वजनिक बांधकाम विभागाला सात घालण्यात आली. या जीवघेण्या खड्ड्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे पडले आहे देखील समजत नाही. अनेकदा निवेदन देऊनही या गेंड्याच्या कातडीचा प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा तालुक्यातील लोकांना घेऊन अनोखे आंदोलन छेडू असा इशारा अभिजीत कुडे यांनी दिला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close