ताज्या घडामोडी

नव्याने प्रस्तावित असलेल्या शंभर दारू दुकानांना परवानगी देऊ नये – भाजपची मागणी

जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाचे अप्पर जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना निवेदन.

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी


राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून १ एप्रिल २०१५ रोजी तत्कालीन फडणवीस सरकारने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्रीचे आणि दारू पिण्याचे परवाने रद्द करून जिल्ह्यात दारूबंदी लागू केली होती. परंतू २७ मे २०२१ रोजी मविआ सरकारने जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचे पातक केले. जिल्ह्याची दारूबंदी उठल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढून जिल्ह्याच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा येत आहे. अशी एकूणच परिस्थिती असताना सुद्धा जिल्हा प्रशासन जवळपास शंभर नव्या दारू दुकानांना परवानगी देण्याच्या तयारीत आहे.
या निर्णयाच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा व महानगर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांचे मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री. संजय पाटील यांना निवेदन दिले.
जिल्ह्याची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नव्याने प्रस्तावित असलेल्या शंभर दारू दुकानांना अजिबात परवानगी देऊ नये असे या निवेदनात म्हटले आहे.
या शिष्टमंडळात, महिला मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्ष सौ. अंजलीताई घोटेकर, जिल्हा संगटन महामंत्री संजय गजपुरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महामंत्री रविंद्र गुरनूले, आत्मनिर्भर भारत अभियानाचे संयोजिका सौ. किरणताई बुटले, माजी पं.स. उपसभापती विनोद देशमुख, महानगराचे पश्चिम मंडळ अध्यक्ष रवी लोनकर यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close