शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिशी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

तालुका प्रतिनिधी:प्रा. विश्वनाथ मस्के
भिशी — येथील शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भिशी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी माननीय प्राचार्य शिरभय्ये सर, सचिव नितेश सर, अविनाश बोरकर सर, विश्वनाथ मस्के सर तसेच शाळेतील सर्व अध्यापिका उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्त्री शिक्षणासाठीच्या योगदानावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. लहान मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे प्रतीक साकारत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, समानता व समाजप्रबोधनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.









