समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चंद्रपुर यांचे मार्फत मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त गट अ व समाजकल्याण अधिकारी गट ब या पदभरतीत शैक्षणिक पात्रता समाजकार्य शिक्षण करण्याबाबत व ही पदभरती राज्य सेवा मध्ये समाविष्ट न करता सरळसेवा मधुन भरावे या साठी मा. उद्धव ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. धनंजय मुंडे साहेब,समाजकल्याण मंत्री, महा.राज्य याना उपविभागीय अधिकारी यांचा मार्फत निवेदन देण्यात आले
निवेदनात महिला बाल विकास अधिकारी , परिविक्षा अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गट अ हे नियम शासन ते नियम न बद्दलवता सरळसेवा मधून भरण्यात यावे
ही मागणी आज समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ, चंद्रपुर ने केली.
ही जर मागणी मान्य न झाल्यास समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाने आंदोलन करण्याचे इशारा दिला आहे
यावेळी निवेदन देताना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार, टायगर ग्रुप चे शहर अध्यक्ष रोहन ननावरे, समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ चे महिला तालुका अध्यक्ष ममता वंजारी, सचिव काजल पॉंगुल, पवन इंगोले, व इतर सदस्य उपस्थित होते.